Home

राजकुंवर महिला महाविद्यालय
बनोटी ता. सोयगाव जि. छत्रपती संभाजीनगर

प्रा. डॉ. भगवानसिंग डोभाळ
संस्थापक अध्यक्ष

अभिनंदन !                                                         अभिनंदन..!                                                         अभिनंदन..!

  • विद्यार्थी मित्रांनो आपण मिळवलेल्या यशाबद्दल आपले हार्दिक अभिनंदन राजकुंवर महिला महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणा इच्छिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी मित्रानो आम्ही स्वागतच करतो.

मी व राजकुंवर बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या सर्व पदाधिकान्यांच्या सहकार्याने शिक्षणाची दुर्लक्षित झालेल्या भागात महाविद्यालय सुरू करण्याचा उद्देश हाच आहे की, ज्या परिसरात मी शिकतो जी माझी जन्मभुमी आहे. आपल्या जडण घडणीत ज्या परिवराजा व ज्या वातारवरणाचा खारीचा वाटा आहे तेथील लोकांशी आपले जे संबंध आहेत. त्याती आपली नाती जोडली गेलेली आहे. तेथील गरीब, मागसलेला वर्ग, शिक्षणापासुन वंचित पिढीत दर्जेदार शिक्षण मिळावं, शिकून सवरून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हा एक महत्वाचा उद्देश प्रेरित होऊन प्रतिकुल परिस्थितीत असतानाही महाविद्यालय सुरू करण्याचे स्वप्न साकार केले.

काळाच्या गरजेनुसार शिक्षण क्षेत्रात सतत बदल होत राहतात, नवनवीन विषयांची निकड लक्षात घेवून संस्थेने विद्यापीठ स्तरावर सुरु असलेल्या विषयापैकी बहुतांश विषय आपल्या महाविद्यलयात सुरु केले. राष्ट्रीय स्तरावरीत शिक्षण क्षेत्रातील सर्व साधारण गरजा पुर्ण करण्यासाठी व एक सफल व परिपुर्ण नागरिक घडविण्याठी संस्थेचे स्वप्न आहे व ते साकारण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त गुणात्मक शिक्षणासोबत नैतिक व संस्कारक्षम शिक्षणाची तसेच विद्यार्थ्याच्या कलागुणासह सर्वागिण विकासासाठी “राजकुंवर” ची टीम सदैव तत्पर आहे. आपण लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करून सुसंधीचा लाभ घ्यावा, नियमीत वर्गात तासिकांना हजर राहुन आपल्या ज्ञानाचे भंडार समृद्ध करून घेण्यातच खरा आनंद असतो.